” समाजात एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात असून कुटुंबप्रमुख म्हणून घरातील कर्ता पुरुष असतो, परंतु सदर कर्त्या पुरुषास ऑपरेट करण्याचं काम त्याची पत्नी करत असते, आशा मध्येच घरातील एखादा तरुण मुलगा नुकताच वयात येतो आणि छोट्या मोठ्या नोकरीस सुरुवात करतो असे असताना नकळत प्रत्येक कुटुंबातील घरातील कर्त्या पुरुषास जाण होते की आपल्या मुलाचे लग्न केले पाहिजे, व त्या लग्नानंतर लग्ना साठी व त्या कुटुंबाच्या लग्न संदर्भात नकळत काही अपेक्षा निर्माण होतात, त्यामध्ये सुरुवात होती प्रथम म्हणजे मुलगी सुंदर हवी, मुलगी उच्चशिक्षित आहे, मुलीच्या लोकांकडून चांगले लग्न करून दिले पाहिजे, चांगला थाटामाटा त विवाह संपन्न झाला पाहिजे, लग्नामध्ये चांगल्या प्रकारच्या वस्तू दिल्या पाहिजेत चांगल्या प्रकारे मानपान झाला पाहिजे चांगल्या प्रतीचे जेवण झाले पाहिजे मोठ्या प्रमाणात हुंडा मिळाला पाहिजे अशा एक ना अनेक मागण्या तसेच अपेक्षा ह्या मुलाच्या कुटुंबाच्या दिसून येत आहेत, बर एवढं झालं, तर लग्नानंतरच्या अपेक्षा पुन्हा वर डोकं काढतात..!घरातील लोकांना आता नवीन सून हिच्या कडून अपेक्षा निर्माण होतात.. प्रथम अपेक्षा म्हणजे आमची सून संस्कारीत असावी यात काय नवीन नाही पण यातूनच अपेक्षांची वाढ होती. त्या आपेक्षा म्हणजे घरातील नवीन सुनेने सर्वांचा मानपान ठेवला पाहिजे, सून खानदानी आहे याचे प्रतीक म्हणून डोक्यावरचा पदर पडला नाही पाहिजे, घरातील कुटुंबातील सर्व लोकांचे निमुटपणे काम केली पाहिजेत ते पाणी देण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंत ते ताट धुण्यापासून घर साफ करेपर्यंत, तसेच अजून अपेक्षा घरातील नव्या सुनेने सकाळी लवकर उठले पाहिजे आणि घरातील काम चालू केले पाहिजे आणि अपवाद ( घरातील सुनेच्या वयाची आपली मुलगी सकाळी दहा वाजता उठली तरी चालते ) पण सुनेने मात्र सकाळीच उठले पाहिजे त्यावेळी त्या कुटुंबाच्या एवढे लक्षात येत नाही की, आपली सून सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे तिचा देखील आपल्या मुलीप्रमाणे तिच्या माहेरात ती लाडात वाढली आहे तिने देखील आपल्या मुलीप्रमाणे उच्च शिक्षण घेतले आहे, हे भान केव्हाच सुनेबाबत सासर कडली मंडळी विसरून जातात, आणि यावर घरातील सासू सासरे कर्तव्य या नावाखाली एक प्रकारचा जाच चालू होतो त्याला(crulty ) म्हणता येईल, बर असे असताना नवीन लग्न झालेल्या असतात त्या नवीन सुनेला देखील खूप साऱ्या अपेक्षा स्वप्न घेऊन ती मुलगी नांदायला आलेली असते त्यामुळे सुरुवातीचे दिवस हे निमुटपणे कसलीही तक्रार न करता सांगेल ते काम करत राहते हे मुलीचे चालूच असते परंतु यामध्ये काही अपवाद असतात काही मुलीं लाडामध्ये वाढल्यामुळे ह्या गोष्टी लगोलग स्वीकार होत नाहीत, व त्या सुरुवातीलाच प्रतिकार करू लागतात व सुरुवातीलाच घरामध्ये खटके वाढायला चालू होतात आणि निष्कर्षाचा निघतो “मुलगी आगाव आहे” मुलगी कोणाचा ऐकत नाही असे म्हणून सासू-सासरे आणि नवरा घोषित करून टाकतात, की मुलगी अगाव आहे,परंतु त्या मागची काही कारणे त्या मुलीला असणारे सवयी कोणीही जाणून घेत नाही नाण्याची दुसरी बाजू पाहण्यास कुणीही तयार होत नाही आणि समाज व्यवस्थेमध्ये देखील लगेच प्रतिकार करणारी सून मुळात मान्यच नाही आणि अशा सुनेबाबत तर लगोलगच खटके उडून संसार वादग्रस्त सुरू होतो मग त्यानंतर नियमित प्रमाणे कोर्ट मॅटर, त्यातून डोमेस्टिक वायलेंस, पोटगी 498 चालू होते, कळत नकळत कोर्टातून काही उत्तम कौन्सिलर लोकांकडून किंवा पोलीस स्टेशन मधून दोन्ही बाजू ऐकून घेऊन पर्यायी मार्ग शोधला जातो. जी समाज व्यवस्थेची गरज आहे अशावेळी विभक्त कुटुंब प्रणाली स्वीकारून मनमर्जीप्रमाणे त्या मुलीला व मुलाला विभक्त ठेवून त्यांचा संसार सुखी होते का ही गोष्ट पाहिली जाते त्यामधून जर वैयक्तिक मुलीचे व मुलाचे वाद नसतील तर त्या विभक्त कुटुंबातील मुलगा व मुलीचे संसार नकळत सुळीत चालतो व एकमेकांच्या जबाबदाऱ्या घेऊन संसार सुखी चालू शकतो ही एक नाण्याची बाजू आहे,जर तसे झाले नाही संमतीचा घटस्फोट होतो,आणी मार्ग मोकळा होतो, दुसऱ्या समजदार मुलीची बाजू आपण पाहूया जर ती मुलगी नवीन सून थोडी शांत असेल थोडी समजदार असेल सामाजिक भान असणारे असेल आई-वडिलांचा ऐकणारे असेल कर्तव्याला जागणारी असेल तर ती मुलगी जशी की” वैष्णवी आगवणे ” निमूट पणे सर्व सहन करून पुढे चालण्याचा प्रयत्न करते, परंतु मानवी स्वभाव किंवा गुणधर्म असा आहे की, जो व्यक्ती ऐकून घेतो, त्याला बोलले जाते, जो व्यक्ती सहन करतो त्याला त्रास दिला जातो, व सर्व करत असताना एखादं मूल झालंच तर अशा सुनेमध्ये थोडसं बळ येऊन जात व प्रतिकार चालू होतो त्यावेळी जर मुलगा म्हणजे नवरा थोडासा समजदार असेल आपल्या पत्नीला समजून घेणार असेल तर थोडेफार त्या मुलीला बळ येते व त्या कुटुंबामध्ये राहण्याबाबत थोडी ओढ निर्माण होते, पण असे असताना कुटुंबात सुनेकडून थोडासा प्रतिकार किंवा बंधनातून मोकळीक झाल्या सारखे वागली की लगेच, त्या घरातील सासू चालू होतो, सून पहिल्यासारखी वागत नाही..!लवकर उठतच नाही.! सून पहिल्यासारखी लवकर काम उरकत नाही..! मी सासू असून मला घरातील कामे कराव लागतात..! मी पूर्वी खूपच कष्ट केलेत.! आता माझी बसूनच खायची दिवस आहेत.! आणि जरी( त्या सुनेच्या पाठीमागे लहान मुलगा असेल ) तरी खूप मोठ्या अपेक्षा पूर्वीसारखे कामे नाही झाली तर पुन्हा “घालून पाडून बोलून मानसिक त्रास” चालू होते(करण सासू प्रथम घरांची मालकीण असते ),की लगेच घरातील कर्ता पुरुष सासरा जरी कामानिमित्त बाहेर असेल घरातील काही गोष्टी त्यांना माहिती नसतील तर त्या घरातील सासूचे काम चालू होते. पूर्णपणे घरातील कर्त्या पुरुषाचे सुने विरुद्ध कान भरवायचे, एवढं करून नाही भागलं तर घरामध्ये असणाऱ्या दिराचे कान भरवणे, सुने च्या नवऱ्याचे कान भरवणे, आणि जर घरात “नणंद” नावाचा विषारी ( विषारी यासाठी म्हणायचे हे कॅरेक्टर घर फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात )प्राणी असेल मग तर फार अवघड आहे, जुनी माणसं म्हणतात ” ज्या घरात नणंद आहे त्या घरातील सून केव्हाच टिकत नाही ” आणि हे त्रिकाल बाधित सत्य आहे, आणि जर त्या घरातील ननंद चे लग्न झाले असेल आणि तिचे जर तिच्या कुटुंबावर लक्ष कमी आणि माहेरी लक्ष जास्त असेल तर सासू आणि नणंद यांची केमिस्ट्री एकत्र होऊन त्या घरातील सुनेचा करेक्ट कार्यक्रम चालू होतो, ती सून उठली का ..!ती काय खाते..!ती काय करते..! ती किती वेळ धुन धुते..! ती किती वेळ फोनवर बोलते..! ति स्वयंपाक कशी करते.! ह्या गोष्टी चे रिपोर्टिंग चालू होतं मग चांगल्या कामापेक्षा वाईट कामाकडेच जास्त लक्ष असते, तिने किती चांगलं काम केलंय ह्याकडे पाहिलंच जात नाही त्याउलट काय चुकले हे पाहण्यात जास्त लक्ष असते. आणि जर त्या ननंद चे तिच्या सासरीपेक्षा माहेरी जास्त लक्ष असेल तर जास्त अवघड आहे, त्यामध्ये त्या घरातील ननंद सासरी थोडेसे स्वतंत्र असेल( नवरा दलिंदर म्हणजे बायको चे ऐकणारा ) असेल तर मग अवघड च अवघड आहे, आणि त्या कुटुंबातील सुनेचे त्याहून अवघड, मग सुरू होतो खरा खेळ सासूचे नंनद रोजच्या रोज रिपोर्टिंग घरातील कर्ता पुरुष तसेच नवरा मुलगा यांचे जोरात कान भरावाचे काम चालू असते त्यातून घरात एखाद्या बाहेरील व्यक्तीचे जाणे येणे असेल तर मग खूपच अवघड त्या व्यक्तीने घरात यायचं आणि वेगळ्या प्रकारे” सुनेचे सासूला सांगायचे आणि सासूचे सुनेला सांगायचे ” त्यातून घरात वेगळा संघर्ष चालू होतो, आणि कळत नकळत जर मुलगी गरीब कुटुंबातील असेल आणि तिला तिच्या नवऱ्याने समजून घेतले नाही तर शंभर टक्के वैष्णवी हगवणे होतीच होती ., मी वकील म्हणून काम करत असताना एक नव्हे असे अनेक प्रकरण जवळून पाहिले आहेत की मुलींनी आत्महत्या केली आहे,आणि त्यामध्ये त्या घरातील सासू-सासरे दिर नणंद नंदावी हे जेलमध्ये गेले आहेत, ही सत्य घटना आहे, की अशा एक ना अनेक वैष्णवी हगवणे महाराष्ट्रात झाले आहेत,त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि समाजव्यवस्था सुधारली पाहिजे त्याकरता काही विशेष बाबी मला माझ्या अनुभवातून नमूद कराव वाटतात की, एखाद्या एकत्रित कुटुंबात कोणतीही गोष्ट घडत असताना त्या घरातील कर्त्या पुरुषाचे बारकाईने लक्ष आहे का ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, “म्हणजे कानात आणि डोळ्यात खूप मोठा फरक आहे” अशी म्हण आहे तितकीच खरी आहे त्यामुळे कुटुंबामध्ये देखील बंद डोळ्याने आपली पत्नी किंवा मुलीवर देखील विश्वास न ठेवता एखादी गोष्ट घरामध्ये घडली तर लगेच समोरासमोर बसून खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा करावी आणि मगच कोणताही निर्णय घ्यावा कोणाचे ऐकून कोणालाही दोषी धरू नये आणि जर खऱ्या अर्थाने जर कोण चुकत असेल तर त्याला त्याच वेळी समज दिली गेली तर मग ते कोणी असो सासू असो वा सून. हे कर्तव्य जर घरातील कर्त्या पुरुषास करता येत नसेल तर ते कुटुंब निरार्थक आहे, घरातील वाद हा घरातच बसून शांतपणे न्यायबुद्धीने दोन्ही बाजूंचा विचार करून समंजशीच्या भूमिका घेऊन तसेच व्यक्ती स्वतंत्र प्रमाणे जशी आपण आपल्या मुलीला स्वातंत्र्य दिले, लाड पुरवला त्याचप्रमाणे जर सुनेला देखील विचारात घेऊन विश्वासात घेऊन मुलीप्रमाणे वागवले तर त्या घरामध्ये कधीही तंटा होणार नाही पण मनामध्ये कसलातरी आड ठेवून घरातील कुटुंबातील लोक त्या घरातील सुनेसोबत वागत असतील तर त्या कुटुंबाचा विनाश हा 100% ठरला आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, घरातील मुलगी म्हणजेच ननंद तिला वेळेवर तिच्या सासरी पाठवणं हे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर जुनी माणसांनी सांगून ठेवलंच आहे ” ज्या घरात नणंद आहे, त्या घरात सुन टिकू शकत नाही ” ही जबाबदारी त्या घरातील कर्त्या पुरुषांनी लक्षात घेऊन त्याप्रमाणे घरात वागले अत्यंत चांगले होईल, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलीला जसे वागवतो तसेच सुनेला वागवले तर निश्चितच त्या कुटुंबाचे सुख नांदेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरातील ननंद किंवा मुलीला सतत माहेरी येणे ह्या गोष्टीमुळे दोन्हीपैकी एक कुटुंब निश्चितच तुटते एकतर सुनेचा संसार तुटतो नाहीतर मुलीचे कुटुंब तुटते..! हे त्रिकाल बादी सत्य आहे.., आणि महत्वाचे म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत म्हणजे सासु सुनेच किंवा घरातील कोणतीही गोष्ट ही बाहेरील कोनीही व्यक्तीबर कधीही शेअर करू नये जर शेअर केलीस तर ती व्यक्ती गैरफायदा घेऊन कुटुंबामध्ये वाद लावल्याशिवाय राहत नाही त्यामुळे घरातील मुलगी असेल किंवा कोणताही नातेवाईक असेल किंवा कोणताही मित्र असेल किंवा कोणताही पाहुणा असेल जो जो कुटुंबातील सदस्य नाही अशा व्यक्तीला घराच्या कोणती ही गोष्ट सांगू नये, व विचारात घेऊ नये जर घरातील काही सांगितलं तर आता च “वैष्णवी हगवणे” हिच्या कुटुंबात देखील निलेश चव्हाण नावाचा इसम लूडबुड करताना दिसत आहे., त्यामुळे त्या कुटुंबाचे वाटोळे झाले आहे व ते कुटुंब देशोधडीला लागले आहे त्यामुळे जुन्या माणसांची म्हण आहे ” उंबरा बाहेरील पायथान उंबऱ्या बाहेरच ठेवा ” याचा अर्थ असा होतो की बाहेरील माणूस कितीही जवळचा असो, पावणा-रावळा असो त्याला प्रत्येकाला एका मर्यादितच ठेवावे., आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकत्र कुटुंब म्हणजे कोणावरही एकावर बंधन नसावा जर व्यक्तिगत काही समज गैरसमज असतील तर समंजसपणे पणे विभक्त कुटुंब पद्धत ही स्वीकारावी यातच त्या कुटुंबाचे भले पण टिकून राहते यातूनच चांगल्या प्रकारे कुटुंब व्यवस्तित राहत कौटुंबिक जिव्हाळा कौटुंबिक प्रेम अस्तित्वात राहील नाहीतर हागवणे सारखी कुटुंब बेचिराख होतील..! त्यामुळे मलाअस वाटतं प्रत्येक कुटुंबाला एक चांगला कौन्सिलर असावा ज्याला कुटुंब व्यवस्थेचा चांगल्या प्रकारे अभ्यास आहे अशा व्यक्तीकडून प्रत्येक कुटुंबाचे व्यवस्थित रित्या काउंसलिंग होणे हे आत्ताच्या घडीला अत्यंत गरजेचे आहे आणि त्यातून समज गैरसमज दूर होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी कुटुंबाचे काही किरकोळ वाद विवाद असतील तर एकत्रित बसून विचारांची देवाण-घेवाण करून वाद संपुष्टात आणावेत..! एडवोकेट गणेश रा धेंडे मो नं 9561142504

