मुख्य संपादक. अमोल धेंडे
मो.नं. 8149494664

आज दिनांक ०७ डिसेंबर रोजी सायंकाळी दौंड तालुक्यातील कडेठान गावातील महिला लता बबन धावडे वय 45 या शेतात खुरपनी काम करत असताना बिबट्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना ऊस पिकात फरफरत नेले यामध्ये लता बबन धावडे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी घटनेनंतर दाखल झाले नसल्याने गावकरी चिडले असल्याने पहावयास मिळते. शेतकऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्याची भीती घेतल्याचे प्राथमिक निदर्शनास येत आहे. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

